Astro Tips : पौष महिन्यात चुकूनही तुळशीच्या रोपात टाकू नका 'या' 5 वस्तू; आयुष्यभर भोगाल कर्माची फळं
मान्यतेनुसार, ज्या घरात हिरवंगार तुळशीचं रोप असतं तिथे सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. त्यानुसार, पौष महिन्यातील तुळशी पूजनाचं फार महत्त्व आहे. या महिन्यात गंगा स्नान आणि उपवास करण्याची परंपरा आहे. मात्र, या महिन्यात काही वस्तूंना अर्पित करणं फार अशुभ मानलं जातं. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौष महिन्यात तुळशीच्या रोपात चुकूनही दूध किंवा दुधात मिसळलेलं पाणी चढवू नये. हे अशुभतेचं लक्षण आहे. यामुळे तुळशीचं रोप नष्ट होऊ शकते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास, दुधापासून माती खराब होऊ शकते. तसेच, रोप कमजोर होऊ शकतं.
या दरम्यान तुळशीवर ऊसाचा रस चढवणं वर्जित आहे. धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास, यामुळे तुळशीचं रोप सुकू शकतं. तसेच, घराच्या समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
तुळशीच्या रोपावर कधीच मिठाचं पाणी किंवा खारट वस्तू चढवू नये. धार्मिक मान्यतेनुसार, याचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो.
तुळशीच्या रोपात सुकलेली फुलं टाकू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. यासाठीच, तुळशीची पूजा करताना नेहमी ताजी फुलं वापरावीत
संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपात जल चढवू नये. मान्यतेनुसार, तुळस निद्रावस्थेत असते. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी जल चढवावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)