Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anupam Kher Birthday: 'सारांश' ते 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'.... अनुपम खेर यांचा बॉलिवूडमधील प्रवास
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बायोपिक 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' मध्ये मनमोहन सिंह यांची भूमिका त्यांनी साकारली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुपम खेर यांनी आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सारांश, डॅडी, दिल है की मानता नही, राम लखन, कर्मा, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, शोला आणि शबनम यासारख्या सुपरहिट सिनेमात त्यांनी काम केलं.
अनुपम खेर यांना 'डॅडी' आणि 'मैने गांधी को नहीं मारा' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सारांश सिनेमासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला होता. एवढेच नव्हे तर त्यांना पाच वेळा बेस्ट परफॉर्मन्स इन कॉमिक रोलसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यासह त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारेही सन्मानित करण्यात आले आहे.
अनुपम खेर यांचं विनोदाचं टायमिंगही जबरदस्त आहे. अनुपम यांनी काम केलेले अनेक विनोदी सिनेमे हिट ठरले आहेत. डॅडी चित्रपटातील त्याची गंभीर भूमिका चांगलीच गाजली.
आमगम चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. परंतु त्यांना या चित्रपटापासून फारसा फायदा झाला नाही. 1984 साली आलेल्या 'सारांश' सिनेमातील त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली आणि त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. तरूण असूनही त्यांनी या चित्रपटात वयस्कर व्यक्तीची भूमिका निभावली होती.
अनुपम खेर यांनी शिमला येथील डीएव्ही स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे अॅडमिशन घेतलं आणि अभिनयाचं शिक्षण घेतलं.
अनुपम खेर यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी झाला होता.
अनुपम खेर बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यापैकी एका आहेत. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका लोकांना आजही आठवतात. त्यात कर्मा सिनेमातील डॉक्टर डेन असो किंवा दिल है की मानता नही मधील अमीर खानच्या वडिलांची भूमिका असो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -