Valentine Day : अनन्या पांडेने इशान खट्टर सोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे' पहा फोटो

ईशान आणि अनन्या गेल्या वर्षी खाली-पीली या चित्रपटात एकत्र दिसले होते. तेव्हापासून या दोघांमधील जवळीक वाढत गेली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या महिन्यात ते मालदीवमध्ये एकत्रित सुट्टी साजरी करण्यासाठी गेले असताना या दोघांच्या डेटिंगची बातमी उघडकीस आली.

ईशान अनन्याची काळजी करताना पाहायला मिळाला. तो तिला गाडीत बसवताना दिसला.
या नवीन लव्ह बर्ड्सची जोडी गोंडस दिसत होती. एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करून, दोघांनीही हे सिद्ध केले की ते दोघेही प्रेमात आहेत. तरीही दोघांनी अजूनही आपल्या नात्यावर मौन बाळगले आहे.
ईशान खट्टर ब्लू टीशर्ट आणि व्हाईट जॉगिंग लोअरमध्ये स्पोर्टी लूकमध्ये मस्त दिसत होता.
दोघे बोलत बोलत रेस्टॉरंटमधून बाहेर आले. यावेळी अनन्या आणि ईशानचा ऐकमेकांच्या हातात हात होता.
अनन्या व्हाईट वन शोल्डर ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने निळ्या रंगाचा मास्क घातला होता. तर पायात पांढरे स्नीकर्स पाहायला मिळाले.
बॉलिवूड स्टार्सवर 'व्हॅलेंटाईन डे'चा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. अनेक सेलिब्रीटी या दिवशी उघडपणे आपले प्रेम व्यक्त करताना दिसले. या दोघांनाही मुंबईतील मीजू रेस्टॉरंटमध्ये स्पॉट केलंय. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांना पहायला मिळाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -