PHOTO | सौंदर्याची खाण आंबोलीतील अद्भुत नजारा, पाहा खास फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्व फोटो- महादेव भिसे
कोरोनामुळे पर्यटन स्थळ बंद असल्याने हा निसर्गाचा आविष्कार पर्यटकांना अनुभवता येत नसल्याने एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांसाठी निसर्गप्रेमी महादेव भिसे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेली दृष्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी
हे सौंदर्य बघण्यासाठी या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक तसेच स्थानिक आवर्जून घाट रस्त्यावर थांबून या सौंदर्याचा आनंद आपल्या मोबाईलमध्ये टिपत आहेत.
आंबोलीत ढगांची चादर संपूर्ण दरीवर पांघरल्या प्रमाणे पसरली आहे.
गेले आठ ते दहा दिवस आंबोलीमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून ऊन, पाऊस, धुके आणि सोबतीला हिरवा निसर्ग त्यामुळे आंबोलीच्या सौंदर्य अधिकच खुलून गेलं आहे.
सध्या आंबोलीमध्ये पावसाचा लपंडाव सुरू असून ऊन, पाऊस, धुकं आणि हिरवाई यामुळे आंबोलीचा निसर्ग स्वर्गाहून सुंदर दिसू लागला आहे.
कोकणातील वर्षापर्यटनाचे महत्वाचे आणि ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत निसर्गाचं एक सुंदर रूप पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -