Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना; मोठं नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतकऱ्यावर पपईची लागवड करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rains) जोर कायम आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.
गारपिटीचा फटका हा नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे
विषाणूजन्य रोगांमुळे पपईची पानगळ झाली होती. गारपिटीमुळे राहिलेले पानसुद्धा गळून पडले आहेत
गारांचा मारा पपईच्या फळाला लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे
दुसरीकडे झाडावरील पानांची छत्री गेल्याने उन्हाचाही फटका पपईच्या पिकांना बसला आहे. पानगळ आणि गारपिटीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले
उन्हापासून पपईच्या फळांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापडच्या साह्याने फळे झाकण्यास सुरुवात केली
नैसर्गिक आपत्तीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला
सरकारने पपई उत्पादकांसाठी नुकसान भरपाई सोबतच विशेष अनुदानाची सोय करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.