डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर
देशातील फक्त चार राज्यातच 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्याच्या दृष्टीनं डाळिंब हे पिक खूप महत्वाचे आहे. डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात.
डाळिंबात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम आणि झिंक आढळतात. या कारणांमुळे वर्षभर बाजारात डाळिंबाची मागणी कायम राहते.
भारतात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 54.85 टक्के आहे.
डाळिंब हे एक असे फळ आहे की जे प्रत्येक ऋतूत खाल्ले जाते. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी आणि कमाई या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे.
महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येथील शेतकरी 21. 28 टक्के डाळिंबाचे उत्पादन घेतात.
भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथं 9.51 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (2022-23) आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश डाळिंबाच्या उत्पादनात चौथ्या स्थानावर आहे.
संशोधनानुसार, दररोज डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळं दीर्घकालीन आजार, कर्करोग आणि अनेक हृदयविकारांची शक्यता कमी होण्यास मदत होईल.