Photo : शेतकऱ्यांचा सूर्यफुल शेतीकडं वाढता कल
वाशीम (Washim) जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा सुर्यफुल (Sunflower Cultivation) या तेलवर्गीय पिकाच्या लागवडीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) वाशिम जिल्ह्यात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे.
सद्याच्या स्थितीत तेलांच्या किंमती वाढल्या (Oil prices increased) आहेत. तसेच जमिनीचा पोत राखण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल (Alteration in crops) करणं देखील महत्वाचं आहे.
रब्बी हंगामामध्ये पारंपरिक पीक पेरा म्हणून काही दशकाअगोदर सूर्यफूल पिकाचा पेरा होत होता. मात्र, गेल्या काही दशकापासून सूर्यफूल पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.
आता पुन्हा वाशीम जिल्ह्यातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. वाशिम जिल्ह्यात 25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागववड करण्यात आली आहे.
रब्बी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे.
हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे.
पावसाचा ताण बर्याच प्रमाणात सहन करु शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो.
रब्बी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे.