कॉक हेअर स्टाइलमधील Priyanka Chopra चे क्लासी लूक; चर्चेत आहे नवं फोटोशूट
एक दिवस अगोदर प्रियंकाने 21 वर्षांपूर्वीचा आपला जुना फोटो शेअर केला. तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब मिळवला होता. प्रियंकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit : Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका सध्या लंडनमध्ये आहे. ती एका हॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये गेली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकून पडली. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने लॉकडाऊनचे नियम मोडल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, प्रियंकाने स्वतः यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. (Photo Credit : Instagram)
खासकरुन प्रियंकाचा हा फोटो सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. प्रियंकाने वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केवळ भारतातच नाहीतर, हॉलिवूडमध्येही प्रियंकाच्या या फोटोशूटची चर्चा होत आहे. (Photo Credit : Instagram)
प्रियंकाच्या फोटोशूटमध्ये ती वेगळ्या स्टाईल्सच्या ड्रेसेसमध्ये दिसून आली आहे. (Photo Credit : Instagram)
प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती हटके अंदाजात दिसून येत आहे. खासकरुन तिची हेअरस्टाईल. कॉक हेअरस्टाईलमुळे तिचा संपूर्ण लूक चेंज झाला आहे. तिला पाहून असं वाटतं की, तिने हेअर कट केला आहे. परंतु, प्रियंकाने कोणताही हेअरकट केलेला नसून तिने केस बांधले आहेत. तसेच तिने केस वेगळ्या प्रकारे सेट केले आहेत. (Photo Credit : Instagram)
आपल्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) चा लूक काहीसा बदललेला दिसून आला. हेअरस्टाइलपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत तिचा अंदाज बदलला आहे. दरम्यान, प्रियंकाच्या नव्या फोटोशूटचे फोटो समोर आले असून सगळीकडे तिचीच चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. (Photo Credit : Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -