Kajal Agarwal Wedding : अभिनेत्री काजल अग्रवालचा नववधू साज; गौतम किचलूसोबत लग्नगाठ
सिंघम गर्ल काजल अग्रवाल विवाह बंधनात अडकली असून तिने आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये काजल अग्रवालचा शाही विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसोहळ्यासाठी फार कमी लोकं उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजलच्या वेडिंग वेन्यूचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेडिंग वेन्यू पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी काजलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात खुलासा केला. तिने सांगितलं की, मी बिजनेसमन गौतमची आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड करत आहे.
काजलचा जोडीदार गौतम किचलू इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे.
तसेच गौतमबाबत बोलायचे तर त्याने व्हाइट शेरवानी घातली होती. दोघांचा जोडा शोभून दिसत होता.
दरम्यान, लग्नाआधी काजलची संगीत, महेंदी सोहळे पार पडले. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नववधूचा रुपात काजल अत्यंत सुंदर दिसत होती. तिने लग्नासाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता. त्यासोबत तिने हेव्ही नेकलेसच्या मदतीने आपला लूक कंप्लीट केला होता.
काजल आणि गौतमच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काजलच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या.
35 वर्षीय अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये 'क्यों हो गया न' या चित्रपटामधून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती.
2011 मध्ये तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सिंघममधून तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. त्या चित्रपटानंतर काजलला 'सिंघम गर्ल' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
(Photo Credit : @suhainabanuemz/Instagram & kajalaggarwalofficial/Instagram)
2009 मध्ये आलेला तेलगू चित्रपट 'मगधीरा' काजलच्या करियरला खरी कलाटणी देणारा चित्रपट ठरला.
2007 मध्ये ती आपला पहिला तेलगू चित्रपट 'लक्ष्मी कल्याणम' मधून दिसून आली होती. परंतु, याचवर्षी रिलीज झालेला चित्रपट 'चंदामामा'मधून तिला खरी ओळख मिळाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -