PHOTO | सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरसाठी 'साऊथ स्टाईल' केळवणाचा बेत
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी ते रिलेशनशिपमध्ये असून आपली लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या मिताली आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींकडून देण्यात येणाऱ्या केळवणाचा आनंद घेत आहेत.
दोघेही केळवणाच्या कार्यक्रमांमध्ये बीझी असून ते यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देत असतात.
नुकतंच या दोघांचं 'साऊथ स्टाइल'मध्ये केळवण पार पडलं. याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली या खास केळवणासाठी दाक्षिणात्य पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाले.
काल पहिल्यांदा गोरेगाव ईस्ट मध्ये साऊथ बघायला मिळालं, अशा हटके कॅप्शनसह सिद्धार्थने केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आरती वडगबाळकर आणि आशुतोष परांडकर यांनी सिद्धार्थ-मितालीसाठी खास केळवणाचा बेत आखला होता.
(Photo Credit : @sidchandekar and @mitalimayekar/ instagram)
(Photo Credit : @sidchandekar and @mitalimayekar/ instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -