PHOTO | खाण्याचे रंग, मत्स्य खाद्य वापरुन मालवणच्या समुद्रात 400 फूट तिरंगा साकारला
ते तीन बोटींद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेले. यानंतर दांडी बीच समुद्रात निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन 400 फूट लांब भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळीवेगळी सलामी देण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वीही प्राजित परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटांची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महिन्यांपूर्वी कळसूबाई शिखरावर तिरंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये 321 फूट तिरंगा फडकवला होता.
कोणत्याही देशाचा 400 फूट लांबीचा ध्वज पाण्यामध्ये तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमून गेला होता.
ज्या पद्धतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धूर सोडून हवेत तिरंगा निर्माण करुन सलामी देतात, त्याच पद्धतीची सलामी या अवलियांनी समुद्रात दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणमधील दांडी समुद्राच्या मध्यभागी जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटीच्या मदतीने अंदाजे 400 फूट लांब निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा बनवला.
प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अॅडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मिसाळ, राहुल परदेशी आणि मालवण इथल्या अन्वय अंडरवॉटर सर्विसेसचे रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राश्मीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले.
लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आणि अनेक विक्रम पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनी अनोखी सलामी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -