Zeeshan Siddique : काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दकी (Baba Siddique) हे आज (दि.10) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित असणार आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते झिशान सिद्दकी (Zeeshan Siddique) हे देखील आज बाबा सिद्दकी यांच्यासोबत दिसून आले आहेत. त्यामुळे झिशान सिद्दकी हे देखील आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. झिशान सिद्दकी यांच्या  कार्यलयाबाहेर अजित पवारांच्या सरबराईसाठी लगबग पाहायला मिळत आहे. झिशान सिद्दकी यांनी कार्यालयावरिल बोर्ड देखील काढून टाकला आहे. काँग्रेस पक्षाचा बोर्ड देखील काढल्यामुळे प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. झिशान सिद्दकी काँग्रेस सोडणार का? हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. 


'बाबा सिद्दकींनी झिशान यांच्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही'


बाबा सिद्दकी हे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. शिवाय आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याची माहितीही त्यांनी दिली होती. मात्र, झिशान सिद्दकी यांच्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे झिशान यांनीही काँग्रेस पक्ष सोडला का? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 


'मी अजूनही काँग्रेसमध्येच'


"काँग्रेस नेते झिशान सिद्दकी यांनी या संदर्भात 'एबीपी माझा'शी बातचीत केली आहे. मित्र पक्षांना वाचवण्याच्या नादात काँग्रेसचे नुकसान झाले आहे. माझ्यावर भरपूर अन्याय झाला आहे, हे सर्वांनी पाहिले आहे", असे झिशान सिद्दकी म्हणाले आहेत. झिशान सिद्दकी यांनी काँग्रस सोडणार नाही, असे म्हटले असले तरी पक्षाल घरचा आहेर देताना त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. सध्या काँग्रेसमध्ये असले तरी पुढील काळात त्यांनी काँग्रेस पक्षात बाहेर पडलेले दिसतील, असे झिशान सिद्दकी यांनी स्पष्ट केलय. 


कोण आहेत बाबा सिद्दकी?


 बाबा सिद्दकी हे काँग्रेसचे मुंबईतील महत्वाचे नेते होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी 1999, 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. सिद्दकी  1992 आणि 1997 च्या महापालिका निवडणुकीत विजयीही झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ramesh Chennithala meets Uddhav Thackeray : वंचितचा घोळ संपेना, अन् महाविकास आघाडीचं जागावाटप सुद्धा होईना; काँग्रेस प्रभारी थेट मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला!