Continues below advertisement

यवतमाळ : पोस्टमन (Postman) म्हणजे गावाचा विश्वास. टपालापासून, आधार कार्ड (Aadhaar Card), पेन्शनची कागदपत्रे (Pension Papers), बँकेची पत्रे (Bank Documents) घरी पोहोचवणारा हक्काचा माणूस. पण यवतमाळच्या (Yavatmal) पांढरकवडा (Pandharkawada) येथे हाच विश्वास अक्षरशः तीन पोत्यांत कोंबून घरातच लपवून ठेवला असल्याचं समोर आलं. पोस्टमनने लोकांची पत्रं पोहोचवलीच नाहीत. टपाल खात्याचा आणि माणुसकीचा विश्वास... सगळंच पोत्यामध्येच अडकून राहिलं.

काही महिन्यांपासून 'पोस्ट मिळाली नाही' अशी कुजबुज सुरू होती. शेवटी तपास झाला… आणि पोस्टमनच्या घरातून आधार कार्ड, वृद्धांचे पेन्शन पेपर्स, व्यापाऱ्यांचे धनादेश, LIC पॉलिसी, ATM Credit Card, महत्त्वाची कायदेशीर कागदपत्रे अशी टपाल साहित्याने भरलेली तीन पोती जप्त झाली. सतीश धुर्वे असं या पोस्टमनचं नाव असून, पोस्ट विभागाकडून चौकशी सुरू आहे.

Continues below advertisement

तक्रारीनंतर उघडकीस आलं टपालाचं रहस्य (Postal Scam Exposed)

पांढरकवडा येथील HDFC बँकेचे मनीष प्रधान आणि अ‍ॅड. गाजी इबादुल्ला खान यांनी पोस्ट ऑफिसमधून कागदपत्रे मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पार्सल न मिळाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. शेवटी पोस्ट विभागाने तपास करत थेट पोस्टमनच्या घराची झडती घेतली आणि अक्षरशः पार्सलचं घबाड समोर आलं.

नोकरीची पत्रे, पेन्शन, धनादेश अडकले (Yavatmal Post Office News)

या प्रकारामुळे अनेक युवकांची नोकरीची कॉल लेटर्स (Job Call Letters), वृद्धांचे पेन्शन पेपर्स, व्यापाऱ्यांचे धनादेश (Cheques) अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचं स्पष्ट होत आहे.

कारवाईची मागणी, चौकशीचे आदेश (Pandharkawada News)

तक्रारदारांनी पोस्टमन सतीश धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोस्ट विभागाने या प्रकारावर कारवाई सुरू केली असली, तरी या घटनेमुळे टपाल व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे.

पोस्टमन म्हणजे 'सरकारी विश्वासाचा हात'. पण तोच हात जर पत्रं पोहोचवण्याऐवजी ती घरात साठवू लागला, तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? तीन पोती टपाल सापडली… पण त्यात अडकलेल्या लोकांच्या महिन्यांच्या चिंता, पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे नुकसान कोण भरून काढणार असा सवाल आता विचारला जात आहे.

ही बातमी वाचा: