वाशिम : नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...' अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांच्या दुचाकीला एका भरधाव पिक-अप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरिश हेडांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे यांच्या विचार आणि भाषण-कार्यशैलीवर प्रभावित होऊन हरिश हेडा हे 2008 पासून अविरतपणे मनसे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. कारंजा नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. त्यानंतर दोनच दिवसात हरिश हेडांचाही मृत्यू झाला.
Washim Accident : मुलीला घरी सोडले अन्...
वाशिमच्या कारंजा वाशिम बायपास जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ एका भरधाव पिक-अप वाहनाने हरिश हेडा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
हरिश हेडा यांनी त्यांच्या काही मित्रांची भेट घेतली. मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडले. त्यानंतर ते वाशिम कारंजा बाय पासवर काही कामा निमित्त गेले असता भरधाव पिक-अप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये हरिश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पसरताच कारंजा शहरात शोककळा पसरली.
Washim Harshis Hedaa facebook Post : आदल्या दिवशी भावनिक पोस्ट
कारंजा नगरपालिका निवडणुकीत अध्यक्षपदा करता हरीश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा यांनी निवडणूक लढवली होती. दोनच दिवसा पूर्वी त्याचा निकाल लागला आणि हेडा यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. त्या नंतर मंगळवारी हरीश हेडा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.
'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवतं नाही' या कवितेच्या ओळीत हेडा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून मतदारांचेही आभार मानले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ही बातमी वाचा:
