Yavatmal Accident News: यवतमाळच्या भीषण अपघातानं (Yavatmal Accident Updates) संपूर्ण जिल्हा हादरला. ओमनी गाडीच्या भीषण अपघातात (Accident News) तीन जण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला होता. जखमीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला. एका अज्ञात वाहानानं ओमनी गाडीला समोरासमोर धडक दिल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 


यवतमाळच्या करंजीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोठोडा गावाजवळ ओमणी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी उमरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. ही गाडी वरोरो येथून वृत्तपत्र घेऊन पांढरकवडाच्या दिशेन जात होती.


सकाळी 6 वाजताच्या सुमारास करंजीजवळ एका अज्ञात वाहनानं ओमानीला सामोरासमोर धडक दिली. या धडकेत ओमानीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की, गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. 


कसा झाला अपघात? 


आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. यात ओमनी कारचा दर्शनीभाग चेंदामेंदा झाला आहे. या दुर्घटनेत तीनजण जागीच ठार झाले आहेत, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजीरोड राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा गावाजवळ घडली. सदर ओमनी कार मारेगाव वरुण करंजीकडे जात होती. 


नागपूरवरून मराठी दैनिक वृत्तपत्र पार्सल घेऊन येणारी ओमनी कार आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडा कडे रवाना झाली. राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलाजवळ समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या दर्शनीभागाचा चेंदामेदा झाला असून यातील चालक, वाहक आणि दोन प्रवाशांपैकी एकूण तीनजण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्याचा उपचारादरम्यान त्याचा पण मृत्यू झाला. दरम्यान, भीषण अपघात होताच ट्रकसह चालक पसार झाला. दरम्यान, अपघाताची भीषणता एवढी भयावह आहे की, मृतदेह अजूनही अपघातग्रस्त वाहनात फसलेले आहेत. पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.