मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सभेदरम्यान  मंत्री उदय सामंत (Uday Samant)  यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आल आहे. उदय सामंताच्या (Uday Samant) गाडीवर हल्ला झाल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. हल्ला झाला त्यावेळी गाडीमध्ये कोणीही नव्हते, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.   दगडफेक नेमक्या कोणत्या व्यक्तीने केली हे कळले नसून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे. यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचारसभेवेळी घटना घडली आहे.  
 
समोर आलेल्या माहितीनुसार,  यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,   मंत्री उदय सामंत उपस्थित होते.   ही सभा सुरू असताना पार्किंगमध्ये उभे असलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत त्यांच्या गाडीचा समोरील बाजूची काच फुटली आहे. ही बाब सभा संपल्यानंतर लक्षात आली. 


उदय सामंत त्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीत पुढे रवाना


सभा संपल्यानंतर गाडीत जाताना उदय सामंत गाडीकडे येण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. ही लक्षात आल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची दखल घेत आरोपीचा शोध घेण्यात सुरू केला आहे. उदय सामंत त्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीत पुढे रवाना झाले.   सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या तिकिटामध्ये करण्यात आलेली   काटछाट यामुळे देखील हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


मी सुखरुप आहे : उदय सामंत


 हल्ल्यात कुणालाही  दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे.   हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेले नाही,  असे उदय सामंत म्हणाले.


निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली


सध्या राज्यात निवडणुकीचा रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मेळावे, प्रचारसभा, बैठका घेतल्या जात आहेत.  


हे ही वाचा :


बारामतीत दगाफटका झाला, सुनेत्रा पवार हरल्या तर तुमचं राजकीय करिअर धोक्यात येईल? अजित पवार म्हणाले...