यवतमाळ: यवतमाळमध्ये नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महागाव ते मुडाणा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे (Accident News). मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर (Accident News) अज्ञात व्यक्तीने मृतदेह व दुचाकी महामार्ग लगत असलेल्या नालीमध्ये मृतदेह आणि दुचाकी टाकल्याने हा अपघात (Accident News) नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अर्जुन राजेंद्र देशमुख आणि अजय सतीश विरखेडे असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
मित्राचा वाढदिवस असल्याने हे दोघेजण दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महागाव ते मुडाणा दरम्यान हा अपघात झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने काही अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये दुचाकी आणि मृतदेह फेकून दिला आणि त्या अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणावरून पळ काढला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मध्यरात्री अज्ञात वाहनाने यांच्या दुचाकीला धडक
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील वाकोडी येथील अर्जुन गजेंद्र देशमुख (वय वर्षे 19) व अजय सतीश विरखेडे (वय वर्षे 22) हे शुक्रवार रात्रीच्या सुमारास आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जेवणाच्या पार्टीसाठी नांदगव्हाण येथील जगीरा याठिकाणी हॉटेलमध्ये गेले होते. जेवण करून परतत असताना नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा दरम्यान मध्यरात्री अज्ञात वाहनाने यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने वाहनातील अज्ञात व्यक्तीने दोन्ही युवकांचे मृतदेह व दुचाकी काही अंतरावर असलेल्या नालीमध्ये टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली घटना
ही घटना काल (शनिवारी) सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबची माहिती महागाव पोलीसांना आणि नातेवाईकांना दिली. यानंतर मृतांचे नातेवाईक व महागाव ठाणेदार धनराज निळे यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह अपघातस्थळावरून (Accident News) महामार्गालगत असलेल्या शेतातील नालीत टाकण्यात आल्याने शंकेला वाव निर्माण झाली आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.