Yavatmal News: यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने एका दुकानावर केलेल्या कारवाईला मोठे यश आले आहे.शेतकाऱ्यांकडून अवैद्यरीत्या धान्य खरेदी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्या वतीने संयुक्त पथक तयार करुन धाड  टाकण्यात आली आहे.  चिखलगाव येथे भुमीपुञ ट्रेडर्सचे संचालक चंद्रशेखर देठे यांच्या गोडाऊनमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाची अवैधरित्या खरेदी होत असल्याची  बाब निदर्शनात आली होती. त्यावर कारवाई करत  चंद्रशेखर देठे यांच्या गोडाऊनमध्ये  धाड टाकून तब्बल 500 पोते सोयाबीन,तूर व इतर धान्य जप्त केले आहे. या प्रकरणी भुमीपुञ ट्रेडर्सचे संचालक चंद्रशेखर देठे यांच्यावर बाजार शुल्क, दंड आणि आणि इतर असा 1 लाखाचा दंड आकरण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


अवैधरीत्या धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुळसुळाट  


ऐन पावसाळ्यात राज्यभर कमी पाऊस पडल्याने आणि वेळे आधीच पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यभरात रब्बी व खरीप पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या अपेक्षे प्रमाणे  झाले नसल्याचे चित्र आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी असमाधान व्यक्त करत आहे. परिणामी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालची आवक घटली असून शेतकाऱ्यांनी आपला शेतमाल घरीच ठेवणे पसंद केले आहे. त्यामुळे राज्यात व्यापाऱ्यांकरवी अवैद्यरीत्या धान्य खरेदी करण्याचे प्रकार घडत आहे. असाच एक प्रकार यवतमाळच्या वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने एका दुकानावर टाकलेल्या धाडीतून संमोर आला आहे. 


असा आहे नियम? 


व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्‍या यार्ड मधुनच शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा असा नियम आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणत्‍याही  फसवणुक होत नाही. तसेच बाजार समितीला बाजार शुल्‍क मिळते. परंतु बाजारशुल्‍क वाचविण्‍याच्‍या नादात व्‍यापारी ठिकठिकाणी गोडावून थाटून अवैधरित्‍या शेतमालाची खरेदी करत असल्याचे निदर्शनात आले आहे.असाच एक प्रकार यवतमाळच्या चिखलगाव  येथे घडत असल्याची माहिती समोर आली होती. यावर त्वरित पावले उचलत कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या संयुक्त  पथकाने धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे अवैद्यरीत्या धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई बाजार समितीचे सचिव अशोक झाडे आणि सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे यांनी केली असून या कारवाई मधून 500 पोते सोयाबीन तूरव इतर धान्य जप्त करून बाजार समितीमध्ये आणण्यात आले आहे.