यापूर्वीही जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा त्यांनी तीच री ओढली आहे.
जगात सर्वाधिक सैन्य चीनकडे
चीनच्या मिलिट्रीकडे जगात सर्वाधिक सैन्य आहे. आशियात तर त्यांच्या जवळपासही जाणारा दुसरा देश नाही. चीनकडे जवळपास 23 लाख जवान आणि अधिकारी आहेत.
शेजारील देशांसोबत तणाव
चीन नेहमीच शेजारील देशांशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शेजारील राष्ट्रांसोबत चीनचे संबंध हे तणावाचे आहेत. सातत्याने विस्ताराची भूमिका घेत जमिनी लाटण्याचं काम चीन करत आहे. त्यामुळेच उत्तर कोरिया सोडून कोणत्याच देशाशी चीनचे चांगले संबंध नाहीत.
उत्तर कोरियासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे देशही चीनवर नाराज आहेत. तर दक्षिण चीन समुद्रातील अधिकारांवरुन फिलिपाईन्स, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान या देशांसोबतही चीनचा तणाव आहे. तर भारतोसबत डोकलामवरुन चीनची धूसफूस चालूच आहे.
संबंधित बातम्या
डोकलाम वाद, तोडगा निघाला पण चीनची खुमखुमी कायम
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!