Xi Jinping Third Time President : चीनच्या (China) नव्या राष्ट्रपतींची निवड झाली आहे. शी जिनपिंग (Xi Jinping) यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी स्वीकारली आहे. शुक्रवारी (10 मार्च) शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतली आहेत. यासोबतचे शी जिनपिंग चीनमध्ये सर्वाधिक काळ सेवा देणारे राष्ट्रपती ठरले आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) पक्षाच्या 14 व्या बैठकीत शी जिनपिंग यांना तिसर्‍यांदा राष्ट्रपती बनण्यावर शिक्कामोर्तब झाला. तिसऱ्यांचा राष्ट्रपती बनल्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढणार आहे. जिनपिंग यांनी चीन सरकार आणि अर्थव्यवस्थेवर आपली पकड आणखी मजबूत केली आहे.


शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान


चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसची (CCP) वार्षिक बैठक रविवारी (5 मार्च) रोजी सुरू झाली. या बैठकीमध्ये नव्या राष्ट्रपतीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होता. नॅशनल पीपल्स काँग्रेसची बैठक आठवडाभर सुरू होती. त्यानंतर 10 मार्च रोजी जिनपिंग यांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं. मात्र, या बैठकीत शी जिनपिंग यांना काही आव्हानांचाही सामना करावा लागला. त्यांच्या झिरो-कोविड धोरणाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, या सर्व आव्हानांवर त्यांनी मात केल्याने त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. 






चीनमध्ये एकपक्षीय राजवट


चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.


अशी होते चीनच्या राष्ट्रपतीची निवडणूक 


चीनच्या राष्ट्रपतीची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे 3000 प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये 200 सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील 25 सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्रपती म्हणूनही निवड करतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India vs Pak : है तैय्यार हम... 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही'