X Down Today :  जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट एक्स अर्थात ट्विटरवर लॉगीन करण्यास वापरकर्त्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेष म्हणजे ही अडचण भारतासह इतरही देशांतही निर्माण झाली होती. वापरकर्ते लॉगीन करण्यासाठी प्रयत्न करत असताना फक्त 'समथिंग वेंट राँग' असा मेसेज दाखवला जात होता. त्यामुळे ट्विटर बंद पडण्यामागचे नेमके कारण काय? असे विचारले जात होते. 

Continues below advertisement


जगभरात येत आहे अडचण 


एक्स ही मायक्रोब्लॉगिंग साईट अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मालकीची आहे. या सोशल मीडिच्याचा मालकी हक्क आल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळे भविष्यात या मायक्रोब्लॉगिंग साईटचे महत्त्व कमी होईल, असे म्हटले जात होते. प्रत्यक्ष मात्र तसे झाले नाही. अजूनही या मायक्रोब्लॉगिंग साईटला तेवढेच महत्त्व आहे. मात्र आता एक्सवर लॉगीन करण्यास अनेक अडचणी येत आहेत. जगभरात ही अडचण निर्माण झाली असून त्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होते.  


नेमकी अडचण काय निर्माण झाली? 


एक्स या सोशल मीडियावर लॉगीन करण्याचा प्रयत्न केल्यास 'समथिंग वेंट राँग, ट्राय रिलोडिंग' असा संदेश दाखवला जात होता. एक्सच्या वेब व्हर्जनवर प्रामुख्याने ही अडचण येत होती. युजर्सना एक्सची स्क्रीन पूर्णपणे लोड होत नाहीयेच. एक्स मंचाचे मोबाईल व्हर्जन काही युजर्सच्या मोबाईलवर लोड होत होते. तर काहींना लॉगीन करण्यास अडचण येत होती.  


30 मिनिटे ट्विटर बंद, नंतर सुरूळीत सुरू 


ही तांत्रिक अडचणी साधारण 30 मिनिटे आली होती. 30 मिनिटांनंतर एक्स ही मायक्रोब्लॉगिंग साईड पूर्ववत सुरू झाली. या 30 मिनिटांमध्ये शेकडो ट्विटर वापरकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या.   या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असे प्राथमिक माहितीनुसार म्हटले जात आहे.


हेही वाचा :


Elon Musk 14th child: अमेरिकेत सरकारी बाबूना हैराण करून सोडलेले 'मस्क' थांबायचे नाव घेईना, दिला 14 व्या मुलाला जन्म!


Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...


Donald Trump on India : मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'