मॅक्सिको : जगातल्या 595 किलो वजनी लठ्ठ पुरुषाचं वजन घटवण्यासाठी लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मॅक्सिकोमध्ये या पुरुषावर शस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी 9 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, मॅक्सिकोच्या आग्वास्कालियांटेसचा रहिवाशी असलेल्या जुआनचं वजन 595 किलो आहे. त्याचं वजन घटवण्यासाठी 9 मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र यासाठी त्याच्या विशेष आहाराचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यातून सध्या त्याचं वजन 175 किलोनं घटलं आहे.

जुआनवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर जोस एंटोनिया कास्टेनेडा क्रूज यांनी सांगितले की, '' सध्या जुआननं आपलं 30 टक्के वजन घटवलं असून, त्यावर आता बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेनंतर जुआनचं तब्बल 50 टक्के वजन घटणार आहे. यानंतर गरज भासल्यास वजन घटवण्यासाठी त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येईल.''

दरम्यान, जगातली लठ्ठ महिला ठरलेल्या इजिप्तच्या 498 किलो वजनाच्या इमान अहमदवर मुंबईच्या डॉक्टर लकडावाला यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्यावर 7 मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर डाएट आणि औषोधोपचाराद्वारे तिनं एकूण 142 किलो वजन घटवलं. सध्या तिचं वजन 340 किलो आहे.

संबंधित बातम्या

पाच आठवड्यात इमाननं 142 किलो वजन घटवलं

इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया, पहिला फोटो समोर

शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने उचललं

जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...