नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वकांक्षी योजना 'मेक इन इंडिया'ची जादू संपूर्ण जगावर दिसत आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या 'मेक इन इंडिया'ने चीनच्या 'मेड इन चायना'ला धोबीपछाड दिला आहे. 'मेड इन कंट्री इंडेक्स'च्या यादीत भारतीय उत्पादनांनी चीनलाही मागे टाकलं आहे.
यूरोपीय संघ आणि जगातील 49 देशांसंदर्भातील 'मेड इन कंट्री इंडेक्स-2017' (MICI-2017)ची आकडेवारी सोमवारी जाहीर झाली. या आकडेवारीनुसार भारताने चीनपेक्षा सर्वाधिक गुण मिळवले आहेत. भारतीय उत्पादनांनी 36 गुणांसह 42 वे स्थान पटकावलं आहे. तर चीनला आपल्या 28 गुणांसह 49 व्या स्थानावर आहे.
या यादी अव्वल स्थानी 100 गुणांसह जर्मनीने आपलं स्थान पक्कं केलं आहे. तर स्वित्झर्लंडने 98 गुणांसह दुसरं स्थान गाठलं आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सुरु केलेल्या 'मेक इन इंडिया' मोहिमेला आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मानलं जात आहे.
'मेड इन कंट्री इंडेक्स'च्या सर्वेक्षणात 50 देशातील उत्पादनांची गुणवत्ता, डिझाइन, अधुनिक तंत्रज्ञान, किमतीची वसूली, वैशिष्ठ्य, सुरक्षेचे मापदंड, विश्वासार्हता, टिकाऊपणा आदींचे मुल्यमापन करण्यात आलं. यामध्ये भारताच्या उत्पादनांनी ग्राहकांची मनं जिंकली आहेत. भारतीय उत्पादनांना ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे.