World Senior Citizen Day 2023 : आज 'जागतिक जेष्ठ नागरिक दिन'. आपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. 1988 मध्ये, अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली. या दिनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.


जागतिक जेष्ठ नागरिक दिन का साजरा केला जातो?


युनायटेड स्टेट मध्ये राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.


जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचा इतिहास


दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस “ज्येष्ठ नागरिक दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जसे की, त्यांच्या आरोग्याच्या समस्या, तरुण लोक, कुटुंबातील किंवा घराबाहेरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध समाजामध्ये जनजागृती केली जाते.


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे मूळ 19 ऑगस्ट 1988 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘Ronald Reagan’ यांनी जाहीर केले होते. 5847 नावाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केले. यामध्ये अमेरिकेमधील असलेले कुटुंब, समुदाय आणि राष्ट्रातील वृद्ध लोकांच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला होता. युनायटेड स्टेट काँग्रेसने 138 क्रमांकाच्या हाऊस जॉइंट रेझोल्युशन पास केला. ज्यामध्ये Ronald Reagan यांनी दरवर्षी ऑगस्टचा तिसरा रविवार राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली.


जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचं महत्त्व


युनायटेड नेशन (UN) नमूद केल्याप्रमाणे वृद्ध लोकांची संख्या 2050 पर्यंत 1.5 अब्जपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. ही वाढ पूर्वी आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये ठळकपणे दिसून येईल. कमी विकसित राष्ट्रे 2050 पर्यंत या ग्रहावरील दोन तृतीयांश लोक वृद्ध लोकांचे आयोजन करेल व लोकसंख्येच्या वाढीचा व त्यांच्या सर्वांगीण कल्याण समर्थन देणारी एक मजबूत व्यवस्था अस्तित्वात असणे योग्य आहे.


अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करतात त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे मानतात. काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात. वृद्धांचे अशा समस्येला तोंड देण्यासाठी दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वृद्धांच्या समस्याकडे विशेष लक्ष दिले जाते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी