टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.
Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी : सूत्र
ते म्हणाले की, लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील असं एडहानोम यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवली आहे. लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची तयारी दाखवली. तसंच याबाबत केंद्र सरकारने यासाठी मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.