World Coronavirus Update: जगातल्या 218 देशांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या संख्येत 6 लाखांची वाढ झालीय. तसेच 12 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्या आधी एका दिवसात 11,733 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. त्यानंतर मेक्सिको, इटली, पोलंड, ब्राझील, भारत, रशिया, इराण या देशांचा क्रमांक लागतोय.


एकूण 14 लाख लोकांचा मृत्यू
वर्ल्डोमीटर वेबसाइटच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत 6.07 कोटी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच कोरोनामुळे एकूण 14 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत एकूण 4 कोटी 19 लाख रुग्ण बरे झाले आहेत. अजूनही उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 73 लाख इतकी आहे.


कोरोना बाधित टॉप 10 देश
कोरोनाच्या प्रभावाच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक अमेरिकेचा लागतो. अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1 लाख 78 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 92 लाख इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनाच्या संख्येबाबत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 45 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.


अमेरिका: रुग्णसंख्या- 13,135,658, मृत्यू- 268,198
भारत: रुग्णसंख्या- 9,266,697, मृत्यू- 135,261
ब्राझील: रुग्णसंख्या- 6,166,898, मृत्यू- 170,799
फ्रान्स: रुग्णसंख्या- 2,170,097, मृत्यू- 50,618
रशिया: रुग्णसंख्या- 2,162,503, मृत्यू- 37,538
स्पेन: रुग्णसंख्या- 1,622,632, मृत्यू- 44,037
यूके: रुग्णसंख्या- 1,557,007, मृत्यू- 56,533
इटली: रुग्णसंख्या- 1,480,874, मृत्यू- 52,028
अर्जेंटिना: रुग्णसंख्या- 1,390,388, मृत्यू- 37,714
कोलंबिया: रुग्णसंख्या- 1,270,991, मृत्यू- 35,860


गेल्या 24 तासात जगातील 14 देशांत 20 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 9 देश असे आहेत ज्यात आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या संख्येपैकी 56 टक्के लोक हे केवळ अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको, ब्रिटन आणि इटली या सहा देशांतील आहेत. तसेच जगातील 22 देशांतील कोरोनाची रुग्ण संख्या ही 5 लाखांवर गेली आहे. त्यात इटली, पेरू, दक्षिण आफ्रिका, इराण, जर्मनी, पोलंड आणि चिली या देशांचा समावेश आहे.


भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याबाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. जगात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अमेरिका, फ्रांस, इटली, बेल्जियम, ब्राझील आणि रशिया या देशांत आहे


महत्वाच्या बातम्या: