VIDEO : नवरदेवाची बाईक सुसाट, वधू मागच्या मागे पडली
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 04:26 AM (IST)
मुंबई : नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या एका जोडप्याच्या बाईक राईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिलात तर तुमचीही हसता हसता पुरेवाट होईल. लगीनगाठ बांधल्यानंतर नवरदेव भलत्याच खुशीत आपल्या पत्नीला बाईकवर घेऊन चालले होते. मात्र या खुशीत असताना मधेच एक स्पीडब्रेकर लागला आणि वधू मागच्या मागे खाली पडली. विशेष म्हणजे आपली नवविवाहित पत्नी खाली पडल्याचं या महाशयांच्या ध्यानातच नाही आलं आणि ते सुसाट पुढे निघून गेले. नवरोबाची ही स्कूटरही फार मजेशीर आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी ही स्कूटी दोघांच्या आकाराच्या मानाने व्हिडिओत अगदीच लहानशी दिसत आहे. सुदैवाने इतर पादचारी तरुणीच्या मदतीला धावले आणि तिला उचललं. तिला फारशी दुखापत झाली नसावी, मात्र नवऱ्याशी भेट झाल्यानंतर दोघांमध्ये काय झालं असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. पाहा व्हिडिओ :