नवी दिल्ली : 'पनामा पेपर्स'ने जारी केलेल्या अवैध संपत्तीधारकांच्या यादीत नाव आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोषी आढळले आहेत. पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ठपका ठेवल्याने, त्यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यांच्यावर अवैध संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.

जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातोय. पनामा पेपर्स या नावाने हा गौप्यस्फोट  जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे.

कोणा कोणाची नावं आहेत पनामा पेपर्समध्ये?

देशांचे प्रमुख आणि बडे राजकारणी

1. मौरिको मॅक्री, अध्यक्ष, अर्जेंटिना
2. बिडझिना इव्हॅन्शिविली, माजी पंतप्रधान, जॉर्जिया
3. सिग्मंडर डेवियो गनलाफसन, पंतप्रधान, आईसलंड
4. अयाज अल्लावी, उपाध्यक्ष, इराक (2004-05 मध्ये हंगामी पंतप्रधान)
5. अली अबू अल-राजेब, माजी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, जॉर्डन
6. हमाद बिन जसीम बिन जब्बार अल थानी, माजी पंतप्रधान, कतार
7. हमाद बिन खलीफा अल थानी, कतारचे माजी आमीर
8. सलमान बीन अब्दुल्लाजीज बीन अब्दुलरहमान अल सौद, सौदीचे राजे
9. अहमद अली अल मिरगाणी, सुदानचे माजी अध्यक्ष
10. खलीफा बिन जाएद बिन सुलतान अल नाहयान, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे आमीर
11. पावलो लाझरेंको, माजी पंतप्रधान, यूक्रेन
12. पेट्रो पोरोशेन्को, युक्रेनचे अध्यक्ष

नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान

राजकारणी आणि त्यांचे निकटवर्तीय तसंच बडे अधिकारी

 

  1. मोहम्मद मुस्तफा, पॅलेस्टिनी प्रशासन अध्यक्षांचे निकटवर्तीय
    14. पेट्रो डेलगॅडो, इक्वेडोरच्या सेंट्रल बँकेचे माजी गव्हर्नर
    15. स्टॅवरोज पापास्टॅवरो, माजी ग्रीक पंतप्रधानांचे सल्लागार
    16. जेनेट डिझायर कबिला क्युंगू, संसद सदस्य, कांगो
    17. नुराली अलीयेव, अस्तानाचे माजी उपमहापौर, अस्ताना ही कझाकिस्तानची राजधानी
    18. रिचर्डो फ्रांकोलिनी, पनामाच्या सरकारी बँकेचे माजी प्रमुख
    19. सीझर अल्मेयडा, पेरू देशाच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख
    20. अब्देसलाम बॉशरेब, अल्जेरियाचे उद्योग आणि खाण मंत्री
    21. जोस मारिया बोटलो व्हॅस्कोनसेलस, अंगोलाचे पेट्रोलियम मंत्री
    22. नेस्टर ग्रिंडेटी, ब्यूनॉस आयर्सचे माजी अर्थमंत्री
    23. अँग वाँग वाठना, कंबोडियाचे विधी आणि न्यायमंत्री
    24. जेरोम कोझॅक, फ्रान्सचे माजी मंत्री
    25. जर्नी बेनेडिक्टसन, आईसलंडचे अर्थमंत्री
    26. ओल्फ नॉर्डल, आईसलंडचे गृहमंत्री
    27. कॉनरॅड मिस्सी, माल्टाचे उर्जा आणि आरोग्य मंत्री
    28. जोआवो लायरा, ब्राझिलचे एकेकाळचे सर्वात श्रीमंत खासदार
    29. गालो चिरिबोगा, इक्वेडोरचे विद्यमान अॅटर्नी जनरल आणि माजी पेट्रोलियम-खाण मंत्री
    30. झोल्ट हॉवरथ, हंगेरीच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष
    31. कल्पना रावल, केनियन सुप्रीम कोर्टाच्या उपमुख्य सरन्यायाधीश (1973 मध्ये भारतातून केनियाला गेल्या)
    32. पावेल पिस्कोरस्की, युरोपियन युनियनच्या संसदेचे माजी सदस्य आणि वर्सायचे माजी महापौर
    33. मोहम्मद बिन नायफ बिन अब्दुलअजीज अल सौद, सौदीचे युवराज
    34. पामेला शार्पल्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स (युनायडेट किंगडम) च्या सदस्य
    35. मायकेल अॅशक्रॉफ्ट, हाऊस ऑफ लॉर्ड्स (युनायडेट किंगडम) चे माजी सदस्य
    36. मायकेल मेट्स, ब्रिटीश खासदार
    37. जीझस विलॅनोवा, वेनेझ्युएलाच्या एका तेल उत्पादक कंपनीचे अधिकारी
    38. अलफ्रेडो ओवाली रॉड्रिग्ज, चीलीच्या गुप्तचर संस्थेतील सदस्याचे निकटवर्तीय
    39. इयान किर्बी, बोट्सवानाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती
    40. ब्रुनो जीन रिचर्ड इटोवा, काँगो चे माजी पेट्रोलियम आणि उर्जामंत्री
    41. जेम्स इबोरी, नायजेरियातील डेल्टा स्टेटचे गव्हर्नर
    42. इमॅन्युअल डाहिरो, रवांडाचे माजी गुप्तचर प्रमुख
    43. अट्टान शानसोंगा, संयुक्त राष्ट्रांमध्ये झांबियाचे माजी राजदूत
    44. विक्टर क्रूझ वेफर, व्हेनेझुएलाचे माजी लष्करप्रमुख
    45. अनुराग केजरीवाल, लोकसत्ता या पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, दिल्ली


 

बड्या राजकारण्यांचे नातेवाईक

 

  1. डेन जियागुई, चीनमधील एका बड्या राजकारण्याचे मेव्हणे
    47. जॅस्मीन ली, चीनमधील एका उच्चपदस्थ कम्युनिस्ट नेत्याचे नातू
    48. इडालेसियो डी ऑलिव्हेरा, ब्राझिलच्या लाचखोरीप्रकरणातील संशयित
    49. कोजो अन्नान, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे चिरंजीव
    50. गुईसेफ डोनाल्डो निकोसिया, इटलीच्या सिनेटरचे निकटवर्ती, भ्रष्टाचारात सहआरोपी
    51. सीझर रोसेन्थल, होंडुरासचे माजी उपाध्यक्ष जेम रोसेन्थल यांचे चिरंजीव
    52. कार्लोस गुटिरेज रोबायो, बोगोटाच्या महापौराचे मेव्हणे
    53. मामाडो पोयु, सेनेगलचे माजी मंत्री करीम वेड यांचे निकटवर्ती
    54. मिकैला डोमेक सॉलीस ब्यूमाँट, स्पेनच्या कृषिमंत्र्याच्या पत्नी
    55. पॅट्रीक हेन्री डेलिव्हर्स, चीनी उद्योगपतीची पत्नी आणि भागीदार
    56. झेवियर मोलिना बोनीला, इक्वेडोरच्या गुप्तचर संस्थेचे माजी सल्लागार