न्यूयॉर्क: पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी एक ऑनलाईन मोहीम सुरु आहे. या मोहिमेला तब्बल एक लाखाहून अधिक जनतेने प्रतिसाद देत, या मागणीला समर्थन दिले आहे. त्यामुळे आता यावर ओबामा प्रश्नाला उत्तर द्यावे लागणार आहे.


पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी ऑनलाईन याचिका अमेरिकेत वसलेल्या भारतीयांनी दाखल केली. व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील 'वुई द पीपल' सुविधेत ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून या संकेतस्थळावरील तिसरी सर्वाधिक लोकप्रिय याचिका ठरली आहे. या याचिकेमधील मागणीला आतापर्यंत 1,10,000 नागरिकांनी स्वाक्षरी करुन समर्थन दिले आहे.

अमेरिकन काँग्रेस सदस्य आणि दहशतवादविरोधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पोए आणि अमेरिकन काँग्रेस सदस्य डाना रोरबाशर यांनी प्रतिनिधी सभेत एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणी व्हाईट हाऊसने दहशतवादविरोधातील लढ्यासाठी पाकिस्तानसोबत आपल्या क्षमता वाढवत आहेत, असे सांगितले आहे. व्हाईट हाऊसचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी,ही (पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची प्रक्रिया) प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि कायद्याने किचकट असल्याचं, म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानला 'टेररिस्ट स्टेट' घोषित करण्यासाठी अमेरिकेत प्रस्ताव

'पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र', संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर!

अमेरिका, रशिया, जपान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची चोहोबाजूंनी कोंडी