नवी दिल्ली : एखादा देश सुखी आहे, का नाही हे ठरवण्यासाठी काय निकष लावावे, हा सर्वसामान्य प्रश्न आहे. मात्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने (एसडीएसएन) काही निकषांच्या आधारे डेन्मार्क हा जगातील सर्वात सुखी देश असल्याचं म्हटलं आहे.
दरडोई उत्पन्न, भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि एका व्यक्तीला किती समस्या येतात, या निकषांच्या आधारावर डेन्मार्क जगातला सर्वात देश असल्याचं वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
डेन्मार्कनंतर स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे आणि फिनलँड हे देश सर्वात सुखी देशांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचा 13 वा क्रमांक लागला आहे.
बुरुंडी, सीरिया, टोगो, अफगाणिस्तान आणि बेनन या देशांमध्ये राहणं सर्वात त्रासदायक असल्याचं एसडीएसएनने आपल्या अहवालात म्हटलं आहे.