US ON India-China Tawang Clash : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग (Tawang) सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय (India) आणि चीनी (China) सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर आता अमेरिकेकडून (United State Of America) वक्तव्य आले आहे. अमेरिकेचे हे वक्तव्य भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे जेव्हा भारताने युक्रेनच्या मुद्द्यावर रशियावर टीका करण्यास नकार दिला होता. तेव्हा अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर, चीनच्या मुद्द्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही भारताला पाश्चात्य देशांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे स्पष्ट केले होते.


 


भारत-चीन संघर्षावर अमेरिका काय म्हणाली? 
व्हाईट हाऊसकडून अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीवर भाष्य केलंय, आणि म्हटले की, हा तणाव लवकरच निवळला हे ऐकून आनंद झाला. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, "अमेरिका या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे" आम्हाला हे पाहून आनंद होत आहे की दोन्ही देश संघर्षापासून त्वरीत दूर झाले आहेत."


"भारताच्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा"


पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या मित्रदेशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत. भारताच्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे." अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले की, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जे काही घडत आहे, त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर म्हणाले, "पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडून (पीआरसी) एलएसीवर सैन्य जमा करणे आणि लष्करी पायाभूत सुविधा निर्माण करणे सुरू ठेवत आहे." 


भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न 
9 डिसेंबर रोजी भारतीय सैन्याच्या तीन तुकड्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी 300 हून अधिक चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले, भारतीय जवानांनी त्यांना आधीच रोखले आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. त्यानंतर चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली. यावर काल भारतीय संरक्षण मंत्री म्हणाले की, या संघर्षात काही भारतीय सैनिकांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्यात एकही सैनिक मारला गेला नाही. त्याचवेळी सीमेवरील परिस्थिती स्थिर असल्याचे चीनने सांगितले. तसेच समोरासमोर झालेल्या चकमकीबाबत कोणतीही माहिती दिली नाही.



संयुक्त राष्ट्रांकडून शांततेचे आवाहन
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत-चीन सीमेवर तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही हा तणाव कमी करण्याचे आवाहन करतो, तसेच हा तणाव वाढणार नाही याची काळजी घेतो." त्याच वेळी, तिबेटी संसदेच्या डेप्युटी स्पीकर डोल्मा त्सेरिंग तेखांग यांनी सांगितले की, सीमेवरील तणावासाठी चीन फक्त भारताला दोषी ठरवेल.