हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, अमेरिकेला त्यांच्या जुन्या धोरणांनुसार चालायचे आहे. अमेरिकेला असे वाटते की, भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन त्यांच्यातले वाद मिटवावेत. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानमधील वादावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, असा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. हा प्रस्ताव अमेरिकेने मान्य न करता विचाराधीन ठेवला होता. आता हा प्रस्ताव अमेरिकेकडून फेटाळण्यात आला आहे.
गेल्या काही दशकांपासून अमेरिकेचे हेच म्हणणे आहे, की काश्मीर प्रश्न भारत-पाकिस्तानने आपसात सोडवावा. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार असल्याची चर्चा होती. परंतु या सर्व चर्चा आता फोल ठरल्या आहेत.
श्रृंगला यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अगोदरच स्पष्ट केले आहे की, भारत पाकिस्तान या दोन्ही देशांची इच्छा असेल तरच आम्ही काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करु. परंतु भारताने हा प्रस्ताव मान्य केलेला नाही. त्यामुळे ही बाब स्पष्ट आहे की, अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नाही.
पाहा काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प