New Foreign Policy of Russia: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्या निर्णयांची चर्चा जगभर होत असते. पुतिन यांनी गेल्या महिन्यात रशियन महिला ज्या 10 मुलं जन्माला घालतील त्यांना 13,500 पौंड देण्याची घोषणा केली होती. याची चर्चा जगभर झाली होती. आता त्यांनी नुकत्याच एका धोरणाला (New Foreign Policy) मंजूरी दिली आहे. हे धोरण 'रशियन वर्ल्ड' भोवतीच्या संकल्पनेवर मुद्द्यांवर आधारित आहे. युक्रेनसोबतच्या युद्धाच्या सहा महिन्यांनंतर जारी करण्यात आलेल्या या धोरणाच्या 31 पानांच्या दस्तावेजाचे वर्णन 'मानवतावादी धोरण' असे करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की रशियाने 'रशियन वर्ल्ड' परंपरा आणि आदर्शांचे संरक्षण केले पाहिजे आणि विकास साधला पाहिजे. या धोरणात भारतासोबत संबंध दृढ करण्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे. 


हे नवीन परराष्ट्र धोरण सिद्धांत हे एक प्रकारचे सॉफ्ट पॉवर स्ट्रॅटेजी म्हणून जारी करण्यात आलं आहे. ज्याचे मूळ रशियन राजकारण आणि धर्माभोवती आहे. ज्यामुळे काही कट्टरपंथींनी युक्रेनच्या काही भागांवरील रशियानं जो कब्जा मिळवला होता, त्याचं समर्थन केलं होतं.  


दस्तावेजामध्ये म्हटलं आहे की, रशियन फेडरेशन परदेशात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांना त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी, हितसंबंधांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि रशियन सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी मदत करणार आहे. परदेशी भूमीवर स्थायिक झालेल्या रशियन लोकांशी असलेल्या संबंधांमुळे रशियाला एक वेगळं विश्व तयार करण्याचा प्रयत्न करणारा लोकशाही देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा मजबूत करण्यात मदत झाली आहे. 


रशियन फेडरेशनकडून परदेशात राहणाऱ्या रुसी नागरिकांना मदत


त्यामध्ये म्हटलं आहे की, रशियन फेडरेशन हे परदेशात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांना त्यांचे हक्क पूर्ण करण्यासाठी आणि रशियन संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी सहाय्यता प्रदान करते. त्यामुळं रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा मजबूत करता आली.


1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर पुतिन यांनी नेहमीच नव्याने स्वतंत्र झालेल्या इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या 25 दशलक्ष रशियन लोकांबद्दल आपल्या संवेदना प्रकट करताना दिसून आले आहेत. पुतिन यांनी सोव्हिएत युनियनच्या पतनाला भू-राजकीय आपत्ती म्हटले होते.  


भारत आणि चीनबद्दल नेमकं काय मत


या नव्या धोरणात भारत आणि चीनविषयी रशियाची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून होते. यामध्ये चीन आणि भारताशी सहकार्य वाढवावे, असं या धोरणार म्हटलं आहे. मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका यांच्याशी आपले संबंध अधिक दृढ करावेत, असे नवीन धोरणात म्हटले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


10 मुलांना जन्म देणाऱ्या महिलेस 13 लाख रुपये दिले जाणार, व्लादिमीर पुतिन यांची 'मदर हिरोईन' योजना


Modi Putin Phone Call : पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा, 'या' मुद्द्यांवर झालं बोलणं