नवी दिल्ली : 'आयसिस'च्या दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या 39 भारतीयांचे मृतदेह उद्या भारतात आणले जाणार आहेत. त्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग इराकला रवाना होत आहेत.


भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष वायुसेनेच्या मदतीने आधी ते अमृतसरला आणले जातील. त्यानंतर पटना आणि कोलकाताला नेले जातील.

इराकमध्ये भवन निर्माता कंपनीसाठी काम करणाऱ्या 40 भारतीयांचं 2014 मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. जून 2014 मध्येच त्यांची हत्या झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

नुकतंच या मृतदेहांच्या सापडलेल्या अवशेषांची डीएनए तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या हत्यांबाबत अधिकृतरित्या माहिती संसदेत दिली होती.

मृतांपैकी 31 जण पंजाबी होते. स्वतःला बांगलादेशी मुसलमान म्हणवणाऱ्या एकाने आयसिसच्या तावडीतून पळ काढला होता, तर बादूश भागातील एका टेकडीवर 39 जणांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले.