उंच दरीच्या टोकावरुन बंजी जम्पिंग करण्यासाठी ही तरुणी तयारीत असल्याचं दिसते. तिच्यामागे इन्स्ट्रक्टरही उभा असलेला दिसत आहे. इन्स्ट्रक्टर या तरुणीला दरीत ढकलून देतो. मात्र, पुढच्याच काही सेकंदात त्याला आपली चूक लक्षात आली.
तरुणीला खाली ढकलून देताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेला दोरखंड (रोप) तिला बांधला नव्हता. रोप वरच्या बाजूला तसाच लटकत असल्याचं पाहिल्यानंतर इन्स्ट्रक्टरला चूक लक्षात आली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
त्या तरुणीचं पुढे नेमकं काय झालं, ही घटना नेमकी कुठली आहे, याबाबत अद्याप कोणताही तपशील मिळालेला नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ