UK PM Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटनचे पंतप्रधान (Britain Prime Minister) झाले आहेत. जगभतील दिग्गज मंडळींकडून सुनक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. ब्रिटनच्या नागरिकांकडून ऋषी सुनक पंतप्रधान बनल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र, काही वर्णभेदी ब्रिटीश नागरिकांकडून याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. एका ब्रिटीश टीव्ही शोमध्ये (British TV Show) अशाच एका भारतीय वंशाचा द्वेष (Racist) करणाऱ्या कॉलरचा शोच्या अँकरने चांगलाच समाचार घेतला. शोमध्ये एका कॉलरने म्हटलं की, आम्हाला आमच्यासारखा दिसणारा कुणीतरी ब्रिटनचा पंतप्रधान झालेला आवडेल. यावर अँकरने मिश्किलपणे समाचार घेत म्हटलं की, पण जुन्या काळात तर इंग्रज म्हणजे ब्रिटीश तर अशा देशावर राज्य करण्याच्या प्रयत्नात होते. जिथे त्यांच्यासारखे कुणीच दिसत नव्हतं.


'द डेली शो' नावाचा (The Daily Show) ब्रिटीश टेलिव्हिजन प्रोगाम आहे. यामध्ये अँकर ट्रेव्हर नोहा (Trevor Noah) आहे. या शोमध्ये एका ब्रिटीश नागरिकाने भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावरून  शो होस्ट ट्रेव्हर नोहा याने या व्यक्तीचा चांगला समाचार घेतला. ब्रिटीश टीव्ही शोमध्ये एका ब्रिटीश कॉलरने सुनक यांच्याबाबत वर्णभेदी टीप्पणी केली. ब्रिटीश नसलेली व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान बनणे चांगली गोष्ट नाही आणि ते मला मान्य नाही, असं या वर्णभेदी व्यक्तीने म्हटलं.






अँकर नोहानं टीव्ही शोमध्ये एका कॉलरची ऑडिओ क्लिप चालवली यामध्ये ही व्यक्ती ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटलं की, 'मी पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची तुम्ही कल्पना करू शकता का? इंग्लंडच्या लोकांना त्यांच्यासारखा दिसणारा कोणीतरी पंतप्रधानपदी बघायला आवडेल,' असं या व्यक्तीने म्हटलं.


यावर नोहा याने प्रश्न विचारत मिश्किल टिप्पणी केली की, या कॉलर सारख्या व्यक्तीने सुनक पंतप्रधान झाल्यावर कसली भीती वाटते? यांना त्यांच्यासारखा दिसणारा पंतप्रधान हवा आहे. पण याचे पूर्वज इंग्रज मात्र अशा देशावर राज्य करत होते, जिथे त्यांच्यासारखे दिसणारं कुणीच नव्हतं.'