Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील ज्यामध्ये काही लोक एक्स्ट्राऑर्डिनरी होताना दिसतात. हा एक्स्ट्राऑर्डिनरीपणा काही जण करून दाखवतात. तर काहींना महागात पडतो. सतत काहीतरी वेगळं दाखवण्याच्या नादात जीवाचे तर हाल होतातच पण चुकीची मोठी शिक्षाही भोगावी लागते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपली कार भरधाव वेगाने चालवताना अडचणीत सापडला आहे. अरुंद रस्त्यावर समोरून येणार्या बसला बाजूने जाऊन देण्याऐवजी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे गाडी पूर्णपणे रस्त्यावर आडवी होऊन थोडक्यात या गाडीत बसलेल्या व्यक्तींचा जीव वाचला आहे.
पाहा हा व्हिडीओ :
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. याशिवाय डोंगरावरील अरुंद वाटेवरून समोरून एक बस येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता ठप्प झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार बसला ओव्हरटेक केल्यामुळे पलटी होते. त्यामुळे कार स्वार स्वतःच्या चुकीमुळे अपघाताचा बळी ठरतो. एका बाजूला उलटलेल्या कारमधून सर्व लोक हळू हळू बाहेर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओला पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Trending : अवघ्या 5 दिवसांत महिला दुसऱ्यांदा गरोदर! कारण सांगताना डॉक्टर म्हणाले...
- Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
- माधुरीच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ; फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha