सामान्यत: एखादं बाळ जन्मल्यानंतर 9 ते 10 महिन्यांनी चालायला सुरुवात करतं. व्हायरला होणाऱ्या व्हिडीओमध्ये नर्सने नवजात बाळाला हातात पकडलं, तेव्हा ते पाऊलं टाकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नर्स बाळाला चालवण्याचा प्रयत्न करते आणि बाळही नर्सच्या मदतीने पाऊलं टाकत आहे.
हा व्हिडीओ 25 मे रोजी ब्राझिलमधून अपलोड केला होता. नवजात बाळ अशी कृती करत असल्याचं पाहताना कोणालाही आश्चर्य वाटेल.
फेसबुकवर हा व्हिडीओ तुफान पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले असून 13 लाख नेटिझन्सनी तो शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ