Red River: आतापर्यंत तुम्ही अनेक नद्यांबद्दल ऐकलं असेल. बऱ्याच नद्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, तर बऱ्याच नद्या शापित म्हणून संबोधल्या जातात. त्यासोबतच तुम्ही अशा बऱ्याच नद्या बघितल्या असतील, ज्यांचं पाणी हिरवं (Green Water) किंवा आकाशाप्रमाणे निळंशार (Blue) दिसत असेल. मात्र पेरु देशात अशीही एक नदी आहे जिला खूनी नदी म्हणून ओळखलं जातं. वास्तविक या नदीच्या पाण्याचा रंग रक्तासारखा लाल (Red River) आहे.
नेमकी कुठे आहे ही नदी?
ही खूनी नदी पेरूमधील कुस्को (Cusco) शहरात वाहते. या नदीकडे पाहताच कुणाचं तरी खूप रक्त नदीत सांडलं असावं असाच भास होतो. असं म्हटलं जाते की या नदीचा रंग लाल आहे, कारण त्यात अनेक प्रकारची खनिजं (Minerals) आहेत आणि या खनिजांमुळे तिच्या पाण्याचा रंग लाल (Red Water) आहे. या नदीमधील लाल रंगासाठी आयर्न ऑक्साईड (Iron Oxide) जबाबदार आहे, या खनिजामुळे नदीचं संपूर्ण पाणी लाल झालं आहे. स्थानिक लोक या नदीला पुकामायू (Pukamayu River) म्हणतात.
प्राचीन काळी लोक या नदीला म्हणायचे 'भुताची नदी'
जेव्हा जगात विज्ञान इतकं प्रगत नव्हतं आणि लोकांना या नदीच्या पाण्याच्या लाल रंगामागचं वैज्ञानिक कारण माहित नव्हतं, तेव्हा लोक या नदीला घाबरत होते. स्थानिक लोक या नदीला भुतांची नदी म्हणायचे. सूर्यास्तानंतर या नदीजवळ जायलाही लोक घाबरायचे. पण जेव्हा वैज्ञानिकांनी या नदीच्या रंगाबद्दल खुलासा केला, तेव्हापासून लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला. आता या नदीबद्दलची भीती लोकांच्या मनातून कमी होऊ लागली आहे.
पर्यटकांचे मात्र आजही या नदीबद्दल विचित्र अनुभव
जर तुम्ही पर्यटक म्हणून पेरुला (Peru) जात असाल आणि या नदीच्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर सूर्यास्तानंतर तुम्ही इथे एकटे राहू शकत नाही. या ठिकाणी फिरायला गेलेले पर्यटक नदीच्या आजूबाजूला विचित्र प्रकार घडत असल्याचे भास होत असल्याचा दावा करतात. तर सोशल मीडियावर बरेच पर्यटक या नदीजवळ गेल्यावर वेगळीच भीती वाटत असल्याचे अनुभव देखील सांगतात. दूरपर्यंत पसरलेल्या या नदीच्या लाल पाण्याकडे बघितल्यावर कुणालाही भीती वाटणं साहजिक आहे. रक्तासारखं वाहणारं लाल पाणी आणि आजूबाजूचा शांत परिसर पाहून कुणाच्याही मनात भीती निर्माण होईलच.
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI