Shortest Air Journey: तुम्ही आतापर्यंत जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या उड्डाणाबद्दल ऐकले असेल. भारतातून अमेरिका किंवा युरोपला गेल्यास अनेक तास विमानाने प्रवास करावा लागतो. तुम्ही दिल्लीहून मुंबईला विमानाने गेलात तरी किमान दीड ते दोन तास लागतील. पण कोणी तुम्हाला सांगितले की, जगात असेही एक हवाई उड्डाण आहे की जे टेक ऑफ (Take Off) आणि लँडींगचा वेळ (Landing Time) पकडून गंतव्यस्थानावर (Final Destination) पोहोचण्यासाठी फक्त 53 सेकंदांचा वेळ घेते, तर तुम्ही काय म्हणाल? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे एक व्यावसायिक विमान आहे आणि दररोज अनेक प्रवासी या फ्लाईटची मदत घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.


एवढ्या लहान पल्ल्याचे विमान आहे तरी कुठे?


सीएनएनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुमारे 53 सेकंदांचे हे उड्डाण स्कॉटलंडमध्ये आहे. वास्तविक, हे विमान स्कॉटलंडच्या (Scotland) दोन बेटांमधून उडते. या दोन्ही बेटांवर पूल नसल्याने इथला प्रवास हा विमानानेच होतो. या बेटांदरम्यानचा समुद्र इतका खडकाळ आहे की इथे बोट चालवणे खूप कठीण आहे. यामुळे प्रवासी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी या विमानाची मदत घेतात. हे उड्डाण लोगान एअर (Loganair) एअरलाईन्सद्वारे चालवले जाते, जी गेल्या 50 वर्षांपासून इथे सेवा देत आहे.


विमान प्रवासाचे भाडे किती?


दोन बेटांदरम्यानच्या 53 सेकंदांच्या या सर्वात लहान उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. जर त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले तर ते 1 हजार 815 रुपयांच्या आसपास येईल. मात्र, स्कॉटलंडच्या  (Scotland) म्हणण्यानुसार हे भाडे खूपच कमी आहे. वास्तविक, येथील सरकार या दोन बेटांवर राहणाऱ्या लोकांना या विमान भाड्यात सबसिडी देते, त्यामुळे या लोकांना कमी भाडे मोजावे लागते. या दोन बेटांवर सुमारे 690 लोक राहतात.


या बेटांचे नाव काय?


यापैकी एका बेटाचे नाव वेस्ट्रे (Westray) आणि दुसऱ्या बेटाचे नाव पापा वेस्ट्रे (Papa Westray) आहे. यातील वेस्ट्रेमध्ये (Westray) 600 लोक राहतात. तर, पापा वेस्ट्रेमध्ये (Papa Westray) सुमारे 90 लोक राहतात. हे लोक ज्या विमानाने प्रवास करतात ते खूप लहान विमान आहे आणि एका वेळी फक्त 8 लोक त्यात चढू शकतात. या बेटांवर राहणारे बहुतेक लोक पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करतात. या छोट्या विमानातून प्रवास करण्याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात. तुम्हालाही या छोट्या विमानातून प्रवास करावा वाटत असेल आणि हा अनुभव घ्यावा वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्कॉटलंडला भेट द्यावी लागेल.


हेही वाचा:


Indian Government: चारचाकी डिझेल वाहनं 2027 पर्यंत पूर्णपणे बंद व्हावी; भारत सरकारच्या पॅनेलचा प्रस्ताव


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI