दुहेरी गुन्हेगारी म्हणजे मल्ल्याने केवळ भारतच नाही, तर इंग्लंडचा फसवणूक कायदा 2006 नुसारही मल्ल्या आरोपी असल्याचं सांगितलं जाणार आहे. इंग्लंडच्या कायद्यानुसारही मल्ल्याने बँकांच्या व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणा दाखवला नाही, असं भारतीय तपास यंत्रणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दोन देशांमध्ये एकच गुन्हा केल्यास त्या प्रकरणाला दुहेरी गुन्हेगारी म्हटलं जातं. लंडनच्या कोर्टात भारतीय तपास यंत्रणांच्या बाजूने निकाल लागल्यास मल्ल्याचं प्रत्यार्पण सोपं होईल.
लंडन प्रशासनाने मल्ल्याला रेड कॉर्नर नोटिसच्या आधारावर अटक केली होती. लंडनमध्ये मल्ल्या सध्या जामिनावर आहे. मल्ल्यावर भारतातील 17 बँकांचं 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. मल्ल्या 15 महिन्यांपासून भारत सोडून इंग्लंडमध्ये राहत आहे.
संबंधित बातम्या :