लंडन: भारतीय बँकांचे हजारो कोटीचे कर्ज बुडवलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या सीबीआय न्यायालयात आज सुनावणी झाली.


या सुनावणीदरम्यान न्यायालयानं विजय मल्ल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असंही विजय मल्ल्यानं सुनावलं. मी माझ्यावरील सर्व आरोप नाकारतो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असंही मल्ल्यानं सांगितलं.

विजय मल्ल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.

दरम्यान, आता डिसेंबरपर्यंत मल्ल्याला जामीन मिळाल्यानं त्याला भारतात आणण्याच्या शक्यता धुसर दिसत आहेत.