मुंबई : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून हनिमून डेस्टिनेशन म्हणून सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. व्हिएन्ना शहर आपला जाज्वल्य असा इतिहास आणि भव्य राजवाड्यांसाठी ओळखला जातो.
2016 मध्ये भारतीय पर्यटकांचा विक्रम
व्हिएन्ना पर्यटक बोर्डाच्या जनसंपर्क अधिकारी इसाबेला रुटर यांनी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले, व्हिएन्ना शहर तणावपूर्ण वातावरणापासून लांब आहे. राजधानी म्हणून वेगळा अनुभवही मिळतो.
2017 मध्ये 20 ते 30 टक्के किंवा त्याहून अधिक भारतीय पर्यटक व्हिएन्नात येण्याची आशा आहे. 2016 मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी व्हिएन्नालाच पसंती दिली. त्यामुळे व्हिएन्ना भारतीयांच्या आवडीचं डेस्टिनेशन बनू पाहत आहे.
भारतीयांसंबंधी आणखी इंटरेस्टिंग आकडेवारी व्हिएन्ना पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. व्हिएन्नात गेल्यावर 44 टक्के भारतीय फोर स्टार हॉटेल, 19 टक्के फाईव्ह स्टार हॉटेल, तर 25 टक्के भारतीय थ्री स्टार हॉटेलमध्ये राहणं पसंत करतात.
2015 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये तब्बल 89 हजार 628 भारतीयांनी भेट दिली. विशेष म्हणजे यात सर्वाधिक पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या आहे.