Egg Price Hike : अमेरिकेत (America) सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय वातावरण तापण्याला कारण आहे अंड्याचे. कारण सध्या अमेरिकेत अंड्याचे भाव (Egg Price) गगनाला भिडले आहेत. यूएस (US) कृषी विभागाच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीपर्यंत, मिडवेस्टमध्ये डझनभर अंड्यांची किंमत 8.41 डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशभरात अंड्यांच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकेच्या न्याय विभागाने प्राथमिक तपास सुरू केला आहे.
पुरवठा कमी करुन किंमती वाढवण्याचा प्रयत्न होत आहे का? याची चौकशी विभागाचे अधिकारी करतील. सॅन फ्रान्सिस्कोची परिस्थिती मध्य पश्चिमीसारखीच आहे. या आठवड्यात येथील एका सुपरमार्केटमध्ये डझनभर अंड्यांची (Egg)किंमत 10.99 डॉलर झाली आहे. देशभरात अंड्यांचा मोठा तुटवडा आहे. परिस्थिती अशी आहे की काही सुपरमार्केटमध्ये अंडी खरेदीवर मर्यादा घालण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळं कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळं अंडी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर (USDA) च्या अहवालानुसार, 2024 च्या शेवटच्या तिमाहीत 20 दशलक्षाहून अधिक अंडी देणाऱ्या कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. त्यामुळं अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून लोकांचा खर्चही वाढला आहे.
अमेरिकेत अंड्यांवरुन राजकारण तापलं
अमेरिकेत अंड्याच्या वाढत्या किमतीचा (Egg Price Hike) परिणाम लोकांच्या खिशावर झाला आहे. अमेरिकेत बर्ड फ्लूची दहशत असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकाकारांमध्ये हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. अंड्याच्या किमती वाढल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ट्रम्प यांना जबाबदार धरत आहेत. इतकेच काय तर ट्रम्प प्रशासनाचाही या संदर्भात विरोध सुरू झाला आहे. अंड्याच्या किमतीत झालेल्या या वाढीकडे कायदा आणि उद्योग पाहणाऱ्यांचेही लक्ष लागले आहे. अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे 2022 पर्यंत 130 दशलक्ष पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि समर्थक ट्रम्प प्रशासनावर टीका करत आहेत. न्याय विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे.
ट्रम्प प्रशासनाची चौकशी सुरु
न्याय विभागाने अद्याप चौकशीला प्रतिसाद दिलेला नाही. येथे, कॅल-मेन फूड्स आणि रोझ एकर फार्म्सकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत सुरू झालेला हा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे.
महत्वाच्या बातम्या: