US Visa For Indians: अमेरिकेला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा  (US Visa)  मिळण्यास वेळ लागतो याची सर्वांना कल्पना आहे. परंतु आता हा वेळ कमी होणार  आहे.  व्हिसा मिळण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता भारतीयांना आता फक्त भारताताच नव्हे तर इतर देशात देखील अपॉईंटमेंट घेता येणार आहे.  व्हीसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे. अमेरिकेच्या व्हिजासाठी जवळपास  800 दिवस लागतात. ही समस्या लक्षात घेता अमेरिकेच्या दूतवासाने पाऊल उचलले आहे.


अमेरिकेच्या दूतवासाने ट्विट करत ही घोषणा केली आहे. भारतातील अमेरिका दूतवासाने ट्वीट करत सांगितले आहे की, प्रवाशांना इतर देशातील अमेरिकेच्या दूतवासात आता अर्ज करता येणार आहे.  उदाहरणार्थ अमेरिका दूतावासाने पुढील काही महिन्यांत थायलंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी B1/B2 व्हिजााठी अपॉइंटमेंट देण्यात येणार आहे.






दरम्यान भारतीय दूतवासाने आपल्या एक ट्विटमध्ये महिती दिली आहे की,  मार्च महिन्यापासून टीम वाढवण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात भारतात एक लाख व्हिजा देण्यात आले आहे. ही संख्या जुलै  2019 नंतर सर्वाधिक आहे. येत्या काळात ही संख्या वाढवण्यासाठी नवी टीम देखील वाढवण्यात येणार आहे. 


कोरोना संकटानंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. व्हिसा अर्जदारांना अमेरिकेत जाऊन अभ्यास, प्रवास, त्यांच्या कुटुंबीयांची भेट, नातेवाईकांची भेट आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर व्हिसा अर्जदारांची संख्या इतकी वाढली आहे की प्रतीक्षा कालावधी अनेक महिन्यांचा झाला जो कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. 






व्हिजासाठी सध्या काही केंद्रावर 800 दिवसांचा वेळ लागत आहे. त्यामुळे हा वेळ कमी करण्यासठी हे पाऊल उचलले आहे.  अमेरिकेच्या व्हिसासाठी भारतीयांना दोन वर्षाचा कालावधी लागत  आहे. याचा अर्थ  असा की समजा, जर तुम्ही आता अर्ज केला तर  थेट तुम्हला फेब्रुवारी -मार्च 2025 ची वेळ मिळेल.