वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी आम्ही युद्धात पडणार नसल्याचं म्हटलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अतंर्गत प्रश्न आहे. वॅन्स यांनी यावेळेची अणू युद्ध होणार नाही हे देखील स्पष्ट केलं. मात्र, त्यापूर्वी अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचं आणि चर्चा सुरु ठेवण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय तुर्कीनं देखील भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी आम्ही तणाव कमी करण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. जेडी वॅन्स हे आंतरराष्ट्रीय संघर्षांपासून अमेरिेकनं अलिप्त राहण्याच्या भूमिकेचे समर्थक आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुललाखतीत त्यांनी म्हटलं की आम्ही तेच करु शकतो, की या लोकांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे. मात्र, आम्ही युद्दात सहभागी होणार नाही. ज्याच्याशी मुलभूतपणे आमचा काही संबंध नाही. अमेरिकेला याला नियंत्रित करण्यासंदर्भात काही देणं घेणं नाही. अमेरिका भारताला शस्त्र खाली ठेवा सांगू शकत नाही. त्याचवेळी पाकिस्तानला देखील शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही राजनैतिक मार्गानं या प्रकरणात पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय, असं जेडी वॅन्स म्हणाले. भारत आणि पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे. यासंदर्भात बोलातना जेडी वॅन्स यांनी अणू युद्ध होणार नाही , अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी काही वेळापूर्वी अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्यासोबत देखील चर्चा केली. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी दोन्ही देशांना चर्चेतून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तणाव कमी करण्याचा संदेश दिला आहे आणि दोन्ही देशांनी चर्चा सुरु ठेवावी, असं अमेरिकनं म्हटलं, अमेरिकेचे टॅमी ब्रूस पुढं म्हणाले की तणाव वाढू नये याशिवाय संवाद मुलभूतपणे महत्त्वाचा आहे, चर्चा झाली पाहिजे. अमेरिकेनं गेल्या दोन दिवसांमध्ये दोन्ही देशातील विविध लोकांसोबत चर्चा "यह नहीं बढ़ना चाहिए, और संवाद मूल रूप से महत्वपूर्ण है, बातचीत होनी चाहिए, चुप्पी नहीं होनी चाहिए और अमेरिका जा केल्याचं सांगण्यात आलं. टॅमी ब्रुस यांनी भारत आणि पाकिस्तानमधील स्थिती नाजूक आणि धोकादायक असल्याचं म्हटलं. जिथं चर्चा होत आहे, आम्ही तपशीलाबाबत बोलत नाही, असं ब्रूस यांनी म्हटलं. नेत्यांच्यामध्ये चर्चा सुरु असतना मीडिया, जागतिक माध्यमांमध्ये तपशील न मांडण महत्त्वाचं ठरतं, असंही त्यांनी म्हटलं.