India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्तानचे सगळे हल्ल्याचे प्रयत्न उधळून लावले आहेत. पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर भारताने हल्ले चढवले आहेत. त्यामुळं पाकिस्तानची स्थिती बिकट झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या युद्धाच्या मुद्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar ) यांनी गेल्या 48 तासात 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद साधला आहे. एस जयशंकर हे पाकच्या कुरघोड्यांविरोधात आक्रमक झाले आहेत.
गेल्या 48 तासात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गेल्या 48 तासात 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद साधला आहे. एस जयशंकर हे पाकच्या कुरघोड्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. जयशंकर यांनी कतार, जपान फ्रान्स, जर्मनी, स्पेन, सौदी अरेबिया, इराण, इटली आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला खडसावले
दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिकेनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चांगलच खडसावलं आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी. पाकिस्तानने परिस्थिती आणखी बिघडू देऊ नये असे मार्को रुबियो म्हणाले.
सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री उद्या इस्लामाबदला जाणार
दरम्यान, भारता पाकिस्तान युद्धात सौदी अरेबियाने उडी घेतली आहे. उद्या सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबदला जाणार आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची सौदी अरेबियाने तयारी दर्शवली आहे. पाकिसातनसोबत सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री या युद्धाच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहोत.
पाकिस्तानला भारताचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर या ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे सगळे ड्रोन भारताने पाडले आहेत. अशातच पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर गोळीबार सुरु केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. जम्मू काश्मीरच्या सीमा भागातही पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोनने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळे हल्ले भारताने परतवून लावले आहेत. तसेच राजस्थानच्या सीमेवर देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. या गोळीबाराला देखील भारताने चोख प्रत्युत्तर देखील दिलं आहे. भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं.
महत्वाच्या बातम्या:
भयभीत पाकिस्तानला अमेरिकेचीही लाथ, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन घेरलं, काश्मिरमधील पर्यटकांवरील हल्ला दुर्दैवी असल्याचं ठणकावून सांगितलं!