वॉशिंग्टन : भारताच्या शेजारी दहशतवादाचा गड आहे, असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेतून पाकिस्तानवर सोडलं. त्यानंतर आता अमेरिकेने मोदींच्या वक्तव्याची तातडीने दखल घेतली आहे.

 

आपल्या भूमीवर भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणतेही कट शिजत नाहीत, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असं अमेरिकेने ठणकावलं आहे.

 

अमेरिकेची ही भूमिका म्हणजे पाकिस्तानला भारताविरुद्धचे संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची संधी आहे, असं अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

 

भारत आणि पाकिस्तान हे परस्पर सहकार्यासाठी थेट संवाद साधून, आपापसातील तणाव दूर करण्यासाठी एकत्र येतील. मात्र त्याचवेळी पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर भारताविरुद्धच्या कारवायांबाबत कोणतेही कट शिजत नाहीत, याची हमी देणं आवश्यक आहे. कारण मलाही वाटतं की सध्या अनेक दहशवादी संघटनांची प्रशिक्षण केंद्रं पाकिस्तानात आहेत, असं स्पष्ट मत प्रवक्ते मार्क टोनर यांनी व्यक्त केला.

 

दहशवादाविरुद्ध पाकिस्तानने लढा उभारल्यास त्याला आम्ही साथ देऊ. केवळ दहशतवादविरोध हाच मुद्दा आमच्याकडे पाकिस्तानला सहकार्य करण्यासाठी आहे, असंही टोनर यांनी नमूद केलं.

 

मोदी आणि ओबामांमध्ये चर्चा

दरम्यान, अमेरिका भेटीदरम्यान मोदी आणि बराक ओबामा यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये पाकिस्तान हा मुद्दाही होता, असंही टोनी यांनी स्पष्ट केलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्याशी अमेरिकेशी द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. एका देशाशी चांगले संबंध म्हणजे दुसऱ्या देशाशी वाईट असं नाही. दोन्ही देशांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यामुळे त्या-त्या प्रश्नांशी संबंधित अमेरिकेचे संबंध आहेत, असं टोनी म्हणाले.


भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा


 

दरम्यान, बुधवारी अमेरिकन संसदेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन थेट अमेरिका आणि पाकिस्तानला सुनावलं. “भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड आहे” असं म्हणत नाव न घेता त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. तर दहशतवादाला पोसल्याबद्दल अमेरिकेलाही चिमटे काढले.

 

नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेसमोर तब्बल पाऊण तास भाषण केलं. यामध्ये त्यांना दहशतवादाच्या मुद्द्यावर भर दिला.

संबंधित बातम्या


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे


अमेरिकेचा पाठिंबा, भारताचा MTCR सदस्यत्वाचा मार्ग मोकळा


भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा हल्लाबोल