मुंबई: आपल्यातील अनेकजण २४ तास सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. फेसबुक तर सोशल नेटवर्किग साईटवरील सर्वात जास्त अभिव्यक्त होणारे प्रभावी साधन आहे. यावर अनेकजण आपले फोटो, व्हिडीओ रोजच्या रोज अपलोड करत असतात. अन तुमचे मित्र हा फोटो लाईक, किंवा शेअर करून अधिकाधिक प्रसारित करतात. अशाच एका व्हिडीओने सध्या फेसबुक युजर्सना भुरळ पाडलेली आहे.

या व्हिडीओत एक मुलगा कुत्र्याशी खेळताना पाहायला मिळत आहे. हॉली ब्रियॉक्स मालेट या अमेरिकेतील फेसबुक युजरने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक प्रोफाईलवर अपडेट केला, आणि पाहता पाहता या व्हिडीओवर अक्षरश: लाईक्स, कमेंटसचा पाऊस पडला.

या व्हिडीओमागची कथा मालेट यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर सांगितली आहे. एक नऊ वर्षांचा मुलगा रोज त्या घरी नसताना सायकलवरून येऊन त्यांचा कुत्रा बेलाला रोज प्रेमाने मीठी मारून जायचा. गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेला हा प्रकार त्यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यामुळे हा मुलगा कोण आणि तो रोज बेलाला का मीठी मारुन जातो ? हा प्रश्न त्यांना पडला होता.

त्याचा शोध घेण्यासाठी हा सीसीटीव्ही व्हिडीओ मालेट यांनी फेसबुकवर अपलोड केला. यावर त्यांच्या शेजारच्या महिलेने कमेंट करून तो मुलगा आपला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेच्या घरी जाऊन मालेट दाम्पत्यांनी चौकशी केली. त्याच्याबद्दल ऐकून त्या दोघांनाही धक्का बसला, त्या मुलाचे नाव जोश असे आहे. त्यांच्या घरीही एक पाळीव कुत्रा होता. जोशचे आई-वडील दोघेही नोकरदार असल्याने, रोज सकाळी लवकर उठून कामावर जात. त्यामुळे दिवसभर घरी एकटा असालेल्या जोशची त्यांच्या कुत्र्याशी घट्ट मैत्री झाली. तो रोज त्याच्याशी खेळून आपला एकटेपणा घालवत असे. अचानक एक दिवस त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तो पुन्हा एकलकोंडा बनत होता. त्याला एक दिवस त्याच्या शेजारच्या बेलाचा आधार मिळाला. तो रोज कोणालाही न कळत बिलाशी खेळून त्याला प्रेमाने मीठी मारून जाऊ लागला. हा सर्व प्रकार एकून मालेट दाम्पत्य थक्क झाले होते.

हा व्हिडीओ फेसबुकवर सर्वात जास्त चर्चिला जात आहे. या व्हिडीओला तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला आहे, तर याला साडेसहा लाख लाईक्स मिळालेले आहेत. तर 50 हजार कमेंट्स, आणि सव्वा चार लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

पाहा व्हिडीओ