पाकला होणारी लष्करी मदत बंद, अमेरिकेची कठोर पावलं
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2018 08:18 AM (IST)
अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणाऱ्या तालिबानींविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळेच पाकला केली जाणारी सैन्याची मदत बंद करत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
न्यूयॉर्क : दहशतवादाविरोधात लढाईसाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून होत असलेली आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खोटारडेपणामुळे अमेरिकेने नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून होत असलेली लष्करी मदतही थांबवण्यात आली आहे. दहशतवादाविरोधातील लढाईच्या बाबतीत पाक मूर्ख बनवत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.